खबर महाराष्ट्र न्युज, जळगावः शहरातील गुन्हेगारी घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत, आणि पोलिस प्रशासन यावर आळा घालण्यात अपयशी ठरत आहे. मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास वाघ नगर परिसरात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर गंभीर हल्ला केला. या हल्ल्यात एक तरुण गोळी लागून जखमी झाला आहे, तर दुसऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे.
समता नगर येथे राहणारा अक्षय तायडे (वय २६) हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्या मांडीला गोळी चाटून गेली आहे. तर दुसरा तरुण, अक्षय लोखंडे (वय २१) याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्याने तोही गंभीर जखमी झाला आहे. माहिती नुसार, हे दोघे वाघ नगर स्टॉप परिसरात दुचाकीवर उभे असताना रात्री १० वाजता टोळक्यांनी अचानक हल्ला केला.
हल्ल्यात, टोळक्यातील एका व्यक्तीने गोळीबार केला ज्यामुळे अक्षय तायडेच्या मांडीला गोळी लागली. तसेच, अक्षय लोखंडेच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. हल्ल्यानंतर टोळक्याने या दोन्ही तरुणांच्या दुचाकींची तोडफोड करून घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं
असून नागरिकांनी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी
केली आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
-----------------------------------
पराग काथार मुख्य संपादक
+918149343743
-----------------------------------