जळगाव शहर, प्रतिनिधी ! जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्यामुळे, पोलिसांनी या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी कठोर पावले उचलली होती. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन अव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने कारवाई केली.
दुचाकी चोरीच्या तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. यात सफौ रवि नरवाडे, संजय हिवरकर, पोहेकॉ संघपाल तायडे, मुरलीधर धनगर, हरीलाल पाटील, प्रविण भालेराव यांचा समावेश होता.
दि. 1 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता पिप्राळा हुडको भागात शोएब अफजलखान पठाण (वय 23) आणि शेख आवेश शेख मोहम्मद (वय 21) या दोघांना संशयास्पद परिस्थितीत पकडण्यात आले. चौकशी दरम्यान, शोएब पठाणने जळगाव शहरातील विविध ठिकाणांहून मोटारसायकली आणि मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी कोर्ट चौकातून जुपिटर कंपनीची दुचाकी, सुभाष चौकातून एच.एफ. डिलक्स दुचाकी आणि नेहरू चौकातून बजाज प्लॅटिना दुचाकी चोरी केली होती. तसेच खोटेनगर येथील एका घरातून सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल चोरल्याची कबुली दिली.
चोरी केलेली दोन दुचाकी आणि मोबाईल शेख आवेश शेख मोहम्मद याला विकल्याचे आरोपींनी सांगितले. तपासात हेही निष्पन्न झाले की एक दुचाकी अल्तमेश शे. सलीम रा. पिप्राळा याला विकली होती.
या तपासादरम्यान दोन मोटारसायकली आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला. या आरोपींनी जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतून 2, शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतून 1 आणि जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून 1 मोबाईल चोरी केले होते. या कारवाईमुळे जळगाव शहरातील चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन अव्हाड यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
-----------------------------------
पराग काथार मुख्य संपादक
+918149343743
-----------------------------------