खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव – बहिणीच्या नावाच्या वादातून तिघांनी एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा जबडा फोडल्याची घटना ९ मार्च रोजी एमआयडीसी परिसरात घडली. या घटनेनंतर जखमी तरुणाने तक्रार दिल्यानंतर १५ मार्च रोजी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाब विचारण्यावरून मारहाण
पंकज जयपालसिंह चौधरी (२९, रा. रामेश्वर कॉलनी) हे मजुरीचे काम करतात. ९ मार्च रोजी ते परिसरात असताना तीन जण त्यांच्या जवळ आले आणि “तू आमच्या बहिणीचे नाव का घेतले?” असा जाब विचारला. पंकज यांनी आपण कोणत्याही बहिणीला ओळखत नसल्याचे स्पष्ट केले, मात्र तरीही तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला.
हल्ल्यात जबडा फॅक्चर; जिवे मारण्याची धमकी
या हल्ल्यात एका आरोपीने जबरदस्त बुक्का मारल्याने पंकज चौधरी यांचा उजवा जबडा फ्रॅक्चर झाला. यानंतर आरोपींनी पुन्हा बहिणीचे नाव घेतल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
गुन्हा दाखल; पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणी पंकज चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव करत आहेत.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
क्राईम