खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव: रामानंदनगर परिसरात राहणारा २३ वर्षीय कुणाल अनिल महाजन या तरुणाने बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, गुरुवारी सकाळी ११ वाजता शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, कुणाल हा आपल्या आई-वडील आणि मोठ्या भावासह रामानंदनगर परिसरात राहत होता. तो रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करत होता. बुधवारी रात्री तो घराच्या मागील खोलीत गेला आणि तिथेच त्याने गळफास लावून आयुष्य संपवले. आईने दोन-तीन वेळा दरवाजा ठोठावला; परंतु कुलरचा आवाज येत असल्याने मुलगा झोपला असेल, असे समजून तिने पुन्हा प्रयत्न केला नाही. रात्री १०:३० वाजता वडील आणि मोठ्या भावाने दरवाजा ठोठावून पाहिल्यावर आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा उघडला. तेव्हा कुणाल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना पाहून कुटुंबीयांनी आक्रोश केला.मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. गुरुवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर तो कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रामानंदनगर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
आत्महत्या