एक कोटींच्या नकली नोटांसह रेल्वे प्रवासी अटकेत – दुसरा संशयित फरार रेल्वे पोलिसांचा मोठा तपास सुरू

खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावर तब्बल एक कोटी रुपयांच्या नकली नोटा सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मलकापूरहून भुसावळकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या दोन संशयित प्रवाशांकडे तपासणी दरम्यान ही बनावट चलनी नोटेची रक्कम आढळून आली. रेल्वे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एकाला ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी फरार झाला आहे.

संशयित प्रवाशांवर पोलिसांची करडी नजर

मलकापूर ते भुसावळदरम्यान रेल्वे प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने रेल्वे पोलिसांनी त्यांची तपासणी करण्याचे ठरवले. तपासणी दरम्यान त्यांच्या बॅगेत मोठ्या प्रमाणात पाचशे रुपयांच्या नोटांची बंडले सापडली. प्राथमिक पाहणीत या नोटा खऱ्या असल्याचे वाटले, मात्र सखोल तपासणी केली असता वरची नोट खरी असून इतर सर्व नोटा "चिल्ड्रन बँक" लिहिलेल्या नकली असल्याचे आढळले.

एक आरोपी फरार, तपास सुरू

तपासणीच्या वेळी गोंधळाचा फायदा घेत एक संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाला, तर दुसऱ्याला रेल्वे पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले. या संपूर्ण घटनेनंतर रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलिस अधिक सतर्क झाले आहेत.

बनावट नोटांचा मोठा कट उघडकीस येण्याची शक्यता

सध्या पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेचा मोठा अंतरराज्यीय बनावट नोटांचा रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे.

पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून लवकरच या प्रकरणात अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रवाशांनी अशा कोणत्याही संशयास्पद गोष्टी आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post