आ. राजूमामा भोळेंच्या प्रयत्नांना मुख्यमंत्र्यांची साथ.... जळगावमधील रस्त्यांसाठी 100 कोटींच्या निधीची घोषणा; लवकरच उर्वरित रस्त्यांचे रुपडं पालटणार.

खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार |
मागील काही महिन्यापासुन जळगाव शहरातील बऱ्याचश्या वार्डातील, तसेच शहराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची कामे जोरदारपणे सुरू आहे तर, अजून ही काही प्रभागातील व रस्त्यांचे कामे धिम्या गतीने सुरू असल्याचे दिसुन येत होते. त्यात शहराचे लाडके आमदार राजु मामा भोळे यांना अगदी चिमुकल्यानं पासुन ते वयोवृध्द पर्यंत प्रश्न विचारताना दिसून आले, पण त्या मागे रस्त्यांसाठी लागणारा निधी सुद्धा तेव्हढाच महत्वाचा होता. 
ह्यासर्व अडचणीना निधीची गरज असल्याने जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांनी मुख्यमंत्रीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी केली होती.
वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला मामांना यश ;

आज जळगावात सागर पार्क येथे झालेल्या महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित करताना जळगाव शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी १०० कोटीच्या निधीची घोषणा केली. यामुळे आमदार राजूमामा भोळे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शहरातील नवीन तसेच खराब रस्ते दुरुस्तीला वेग मिळणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post