जळगावची अभिनेत्री तन्वी मल्हारा 'वेदा' तुन झळकली बॉलिवूड च्या रुपेरी पडद्यावर!


खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | नाटक, चित्रपट असो वा संगीत कलाक्षेत्रात जळगावचे कलाकार वेळोवेळी आपली चुणूक दाखवत असतात, त्यातच आता जळगावची सुकन्या तन्वी मल्हारा हिने आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपटात पदार्पण करून जळगावच्या कलाक्षेत्राला झळाळी दिली आहे. निखील अडवाणी दिग्दर्शित आणि जॉन अब्राहम तसेच शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘वेदा’ या जबरदस्त अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपटात जळगावची अभिनेत्री तन्वी मल्हारा हिने ‘गहना’ ही छोटी परंतु महत्त्वाची भूमिका केली आहे. तन्वीचा अभिनय पाहण्यासाठी जळगावच्या विविध चित्रपटगृहांत प्रेक्षक गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. ‘वेदा’ ही एका दलित मुलीच्या संघर्षाची कहाणी आहे. तन्वीने वेदाच्या मोठ्या बहिणीची भूमिका करून आपल्या उत्तम अभिनयाची छाप सोडली आहे.

‘वेदा’ हा अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे. तन्वीने आपल्या भूमिकेसाठी कठोर मेहनत घेतली आहे हे वेळोवेळी दिसून येते. समाजाची भीती आणि भविष्याचे स्वप्न दोघेही तिच्या डोळ्यांत दिसतात. तन्वी ही जळगाव शहरातील ‘मल्हार कम्युनिकेशन्स’चे सीईओ आनंद मल्हारा यांची कन्या आहे. नुकतेच तन्वीच्या ‘वेदा’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग स्टार सिनेमा आणि रिगल सिनेमा येथे आयोजित करण्यात आले होते. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यात सहभाग नोंदवला आणि त्यानंतर अतिशय उत्साहाने त्यांनी तन्वीच्या अभिनयाची प्रशंसा केली. यावेळी तन्वीने देखील उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधला. तन्वी म्हणते, “मी कुठेही ऑडिशनला गेले तरी मला कधीच न्यूनगंड नसतो. मी अभिमानाने सांगते की मी जळगावसारख्या छोट्या शहरातून आली आहे. मी मेहनतीने आणि आपल्या शुभेच्छांच्या बळावर लवकरच चित्रपटात प्रमुख भूमिका करून दाखवेन अशी आशा बाळगते. मला अभिनयाचे प्राथमिक धडे जळगावातच मिळाले.” आपली भूमिका परिणामकारक करण्यासाठी तन्वीने विविध वर्कशॉप्समध्ये सहभाग घेतला, त्यामुळे तिला राजस्थानी/मारवाडी टोन चांगला जमला. वेदा हा नक्की पहावा असा सिनेमा आहे. प्रेक्षक उत्कंठा अनुभवतो आणि सिनेमा शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवतो. सत्य घटनांवर आधारित असल्यामुळे चित्रपट जीवंत वाटतो आणि आपल्याला वस्तुस्थितीच्या जवळ घेवून जातो.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

🪀📲व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा:
https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

Post a Comment

Previous Post Next Post