आयकर भरत असाल तर तुम्हाला ही रेशन घेता येणार नाही !
खबर महाराष्ट्र न्युज, प्रतिनिधी I रोजगार मिळाल्यानंतरही आणि आयकर भरत असतानाही लाभ घेणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे स्वतः हून रेशन कार्ड जमा करणे हा पर्याय सर्वोत्तम ठरणारा आहे. राज्यात अनेक आयकर दाते आहेत
१) आयकर किवा कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स भरणारे लाभार्थी रेशनसाठी पात्र नाहीत.
२) वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये
पेक्षा जास्त असेल तर मोफत रेशन धान्याचा लाभ घेऊ शकत नाहीत,
तर अनेकांचे रेशन बंद होण्याचे संकेत
अन्न व पुरवठा खात्याच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अनेक अपात्र लाभार्थ्यांचे रेशन बंद करण्यात आले आहे. काही जणांचे शासनस्तरावरून तर काहींचे जिल्हापुरवठा अधिकारी कार्यालयाच्या वतीने हा लाभ बंद करण्यात आला आहे. आयकर भरत असतांना सुद्धा रेशनचा लाभ घेत असल्याची बाब उजेडात आली होती. सुदैवाने रेशन कार्डसह धान्य वाटपाची प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने लाभार्थ्यांचे आधार कार्ड संलग्न आहे. त्यातून राज्य शासनाने अनेकांची ओळख पटविली आणि त्यांना मिळणाऱ्या रेशनच्या धान्याचा लाभ तातडीने रोखण्यात आला. आयकर भरत असल्यास आणि निकषात बसत नसल्यास लाभार्थ्यांनी स्वतः हुन रेशन कार्ड जमा करणे सोयीचे ठरणार आहे. कुणी तक्रार केल्यास किंवा प्रशासनाच्या लक्षात आल्यास संबंधित आयकर दाता लाभार्थी अडचणीतही येऊ शकतो.