श्री काथार वाणी समाज महिला मंडळाची कार्यकारिणी घोषित. समाज अध्यक्ष श्री. योगेश वाणी यांनी केले जाहीर


खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार I श्री काथार वाणी समाज महिला मंडळाची स्थापना बुधवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी संस्थेच्या शेठ नागो गणू वाणी मंगल कार्यालयात पार पडली. तसेच या ठिकाणी मंडळाची कार्यकारिणी ही घोषित करण्यात आली. 

श्री काथार वाणी समाज महिला मंडळाच्या स्थापनेच्या वेळी कार्यकारणी सदस्य रंजना अजित वाणी यांनी प्रस्तावनेत आपले विचार मांडले तर सूत्रसंचालन मोनाली सुनील वाणी यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून महिला सल्लागार सदस्य व संस्थेचे अध्यक्ष योगेश गोविंद वाणी यांनी महिला कार्यकारिणी जाहीर केली आहे. 

यावेळी अध्यक्षपदी वनिता बोरसे, उपाध्यक्षपदी शितल वाणी,  सचिव ज्योती वाणी, सहसचिव मोनाली वाणी, कोषाध्यक्ष आरती वाणी तर सह कोषाध्यक्ष अश्विनी वाणी यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारणीचे अध्यक्षांनी त्यांच्या मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की, महिला अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारिणीने दिलेले सर्व कार्यक्रम घेण्यास समाजाची मुख्य कार्यकारणी त्यांना संपूर्णपणे मदत करेल व त्यांच्या पाठीशी उभी राहील.

माजी अध्यक्ष विजय वाणी यांचे मदतीचे आश्वासन 
यावेळी माजी अध्यक्ष विजय वाणी यांनी ही महिला कार्यकारिणी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा व महिलांसाठी जास्तीत जास्त कार्यक्रम घ्यावे व यासाठी मुख्य कार्यकारणी संपूर्ण पणे मदत करेल असे आश्वासन दिले.

त्यानंतर नूतन महिला अध्यक्ष यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून उर्वरित २८ महिला कार्यकारणी सदस्यांची घोषणा केली. याप्रसंगी महिला मंडळाच्या ११० चा वर महिला सदस्य उपस्थित होत्या. मी लवकरच कार्यकारणीची मीटिंग घेऊन त्यांच्या सल्याने चांगल्यात चांगल्या प्रकारचे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्नशील राहील, तसेच महिला सदस्यांना तुमच्याकडे जर काही चांगले कार्यक्रम असतील तर ते सांगावे व ते पण घेण्याचा आपण प्रयत्न करू असे मनोगत नवीन नूतन अध्यक्ष यांनी केले तर आभार प्रदर्शनाचे काम देखील मोनाली वाणी यांनी केले. 

महिला कार्यकारणी खालील प्रमाणे
संगीता नंदकिशोर नांदेडकर, अनिता सुहास वाणी, वैशाली किशोर वाणी, सविता मनीष वाणी, माधुरी संदीप वाणी, संगीता सुरेश वाणी, अर्चना विलास वाणी, रंजना अजित वाणी, अलका अनंत वाणी, अंजली अमोल वाणी, प्रतिभा रवींद्र वाणी, सीमा चंद्रशेखर वाणी, संगीता राजेंद्र वाणी, वर्षा अजय कामळस्कर, नेहा निलेश पंडित, विनया मनीष वाणी, रोहिणी किशोर वाणी, नीता गणेश डाळवाले, सध्या राजेश वाणी, सुनीता शंकर वाणी. 

महिला सल्लागार मंडळ
शुभदा नारायण वाणी, संध्या अरविंद वाणी, सौ मीनाक्षी प्रकाश वाणी, हेमलता भानुदास वाणी, लता मुकुंदा वाणी.

Post a Comment

Previous Post Next Post