जळगाव मध्ये होणार 25 ऑगस्टला पंतप्रधानांचा' लखपती दीदी ' हा ऐतिहासिक मेळावा

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली जागेची पाहणी
 
केंद्रीय ग्रामविकास विभागाच्या सहायक सचिव, जिल्हाधिकारी हेही होते उपस्थित

 खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय 'लखपती दीदी' हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव विमानतळाच्या समोरच्या विस्तीर्ण अशा जागेवर होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या 
संयुक्त सचिव स्वाती शर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाचे अधिकारी यावेळी उवस्थित होते.
 
वाहतुकी संदर्भात नियोजन
 शहरासह छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर वाहतुकीच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांसाठी एक आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जामनेर मार्गावरची वाहतूक अन्य मार्गावर वळविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.


----------------------------------

आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

🪀📲व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा:
https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

Post a Comment

Previous Post Next Post