मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना ' ची सुरुवात जळगाव मधुन, अधिकाधिक बहिणींनी कार्यक्रमाला यावे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन


खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार जळगाव |

शासनाकडून महिलांच्या सबलीकरणा कार्य हा परमार्थ ; अधिकाधिक बहिणींनी  कार्यक्रमाला यावे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

शासनाकडून महिलांच्या सबलीकरणासाठी ' मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना ' असून बहिणींच्या हातात चार पैसे येतील त्या सक्षम होण्याचं हे पहिलं पाऊल असेल. महाराष्ट्र शासनाकडून हे मोठे कार्य होत आहे, हा एका अर्थानी परमार्थ आहे. अशा कार्याची सुरुवात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जळगाव मध्ये होत आहे. 13 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला अधिकाधिक बहिणींनी यावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ' मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण ' योजनेच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सागर पार्क जळगाव येथे 13 ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील आमदार, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, ' मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेचे तालुकानिहाय अध्यक्ष,सचिव यांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते.

 या बैठकीला आ. सुरेश भोळे, आ. चंद्रकांत पाटील, आ. लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंह परदेशी, यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post