खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार |
( जिमाका ) :- लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्याची प्रथा सुरु केली. महाराट्र शासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवात जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे याकरिता सन २०२३ मध्ये राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात आले होते. त्याच धर्तीवर ०७ सप्टेंबर , २०२४ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने ३१ जुलै, २०२४ च्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२४ अंतर्गत मुंबई, मुंबई उपनगर पुणे, ठाणे, या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार असून त्यातून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास रक्कम रुपये पाच लाख, द्वितीय क्रमांक रुपये दोन लाख पन्नास हजार, व तृतीय क्रमांक रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित ४१ जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये पंचविस हजाराचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्या येणार आहे.
सदर स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसा स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सहभागी घेता येईल. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ३१ जुलै, २०२४ च्या शासन निर्णयाच्या सोबत स्पर्धा निवडीचे निकष, अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर अर्जाच्या नमुन्यानुसार स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या Mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर १ ऑगस्ट, २०२४ ते ३१ ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अर्ज सादर करावा स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.