जळगावात विविध पक्षश्रेष्ठींच्या भेटी

खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार जळगाव |विधानसभेच्या निवडणुकीसाठी केवळ दोन महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारणाने  चांगलाच जम धरलेला दिसून येत आहे. त्यात जिल्ह्यात विविध पक्षांचे नेते दौऱ्यावर येत आहेत. 

पुढील प्रमाणे असणार नेत्यांचे दौरे

दि. १२ ऑगस्ट रोजी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमळनेर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते शेतकरी व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.


दि. १३ ऑगस्ट रोजी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौयावर येणार आहे, त्यावेळेस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत, महिलांशी संवाद साधणार आहेत.

दि. १७ ऑगस्ट रोजी, शनिवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे जिल्हा दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल आढावा बैठक घेणार आहेत.

दि. २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. तीन दिवस ते विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात जिल्ह्यात भेटी घेणार आहे.


आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

🪀📲व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा:

https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

संपादक - पराग काथार



Post a Comment

Previous Post Next Post