प्रहारचे अध्यक्ष ना.बच्चू कडू आज जिल्हादौऱ्यावर

खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | दि.२३ - प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आ.बच्चू कडू हे आज जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते जिल्ह्यात येणार असून रावेर-यावल, चाळीसगाव, भुसावळ विधानसभा मतदार संघात भेटी देणार आहेत. 

पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांचे नियोजन
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रहारचे अध्यक्ष आ.बच्चू कडू दि.२३ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. सकाळी चाळीसगाव येथे आगमन होणार असून तेथे ते एका उद्घाटन समारंभाला भेट देऊन पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. त्यानंतर ते भुसावळ येथे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांच्या घरी भेट देतील त्यानंतर ते जळगाव, भुसावळ येथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर, यावलकडे प्रस्थान करतील. रावेर येथे पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्यावर सावदा येथे महिलांसाठी आयोजित स्नेह संवाद मेळाव्याला ते संबोधित करतील. 

महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक पुढ्यात येऊ घातलेली असतांना अजूनही प्रहार जनशक्ती पक्षाने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नसून ते काय भुमिका  घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या आक्रोश मोर्चातील गर्दीने राज्याचे लक्ष प्रहार संघटनेकडे वेधले गेले होते. आ.बच्चू कडू यांनी सरकारला वेळ दिला असून मागण्या मान्य न झाल्यास सप्टेंबरमध्ये मुंबईत मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आ.बच्चू कडू यांचा एकदिवसीय दौरा असून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तो महत्वाचा मानला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधव, प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी जास्तीत जास्त प्रमाणात दौऱ्यात सहभागी व्हावे असे आवाहन, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी केले आहे.

----------------------------------

*आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !*

*🪀📲व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा:*
https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

Post a Comment

Previous Post Next Post