खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार |
जळगाव : अवैध धंद्यांमुळे पिंप्राळा हुडको येथील नागरिक त्रस्त झाले असून, अवैध धंद्यांवर व संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिक पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेत आपली लेखी निवेदन देऊन व्यथा मांडली पोहोचले. यावेळी अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात त्यांनी निवेदन दिले.
यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंप्राळा परिसरातील हुडको या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत. यामुळे तरुणांसह परिसरातील लहान मुले व्यसनाधीन होत त्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे.
याठिकाणी असलेल्या पोलिस चौकीसह महापालिकेच्या उर्दू हायस्कूल व मौलाना अब्दुल कलाम आझाद प्राथमिक शाळेच्या परिसरातील रस्त्यावर सर्रासपणे गावठी हातभट्टी दारूची विक्री केली जाते. त्याच ठिकाणी सट्टा, जुगार देखील सुरू असतात. भर रस्त्यात असलेल्या दारूच्या अड्ड्यांवर दारू पिऊन मद्यपी मोठमोठ्याने शिवीगाळ करीत धिंगाणा घालत असल्याने त्याचा त्रास परिसरात नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी यावेळी मांडल्या. याप्रसंगी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, मुफ्ती हारुन, माजी नगरसेविका हसिना शरीफ शेख, सुरेश सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी, आसीफ शेख, एमआयएमचे अक्रम देशमुख, विनोद निकम यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
🪀📲व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा:
https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4