खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय 'लखपती दीदी' हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव विमानतळाच्या समोरच्या औद्योगिक वसाहतीच्या विस्तीर्ण अशा जागेवर होणार आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, यांनी साधला भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
शासनाच्या लोककल्याणकारी अनेक योजना आहेत. त्यात शेतकऱ्यांना विज बिल माफ, महिलांना 3 गॅस सिलेंडर, अनेक ठिकाणी रस्ते दळणवळणची अतिशय उत्कृष्ट अशी सुविधा देशात उपलब्ध झालेल्या आहेत.केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून जे विकास लाभाच्या योजना भेटत आहे यांनी विरोधक विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही केंद्र व राज्य सरकारचे चांगलं काम सुरू आहे, मात्र विरोधक या मुळे भयभीत झाले आहेत. असे प्रतिपादन गिरीश महाजन यांनी केले.
आमदार सुरेश भोळे यांनी केले आवाहन.
ज्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजना, येणाऱ्या लखपती दीदी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर आपली नावे नोंदणी करुन लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आमदार राजू मामा भोळे, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, उज्वलाताई बेंडाळे, ज्ञानेश्वर जळकेकर, माजी खासदार उल्हास पाटील, राधेश्याम चौधरी, केतकी पाटील, डॉक्टर राजेंद्र फडके, अजय भोळे, देवयानी ठाकरे, अशोक कांडेलकर, माजी महापौर भारतीताई सोनवणे, ज्योती निंभोरे, वैशाली कुलकर्णी, महेश जोशी, रेखा कुलकर्णी, संगिता गवळी, सचिन पानपाटील. राकेश पाटील, हिरालाल कोळी, रेखा वर्मा, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
----------------------------------
*आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !*
*🪀📲व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा:*
https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4