धक्कादायक! पाण्याच्या मोटारीचा शॉक लागून १४ वर्षीय बालिकेचा मृत्यूजळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको भागातील हृदयद्रावक घटना

खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव : शहरातील छत्रपती शिवाजीनगर हुडको परिसरात विजेच्या धक्क्याने एका १४ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २० फेब्रुवारी) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयत बालिकेचे नाव सोनल सुरेश बाविस्कर (वय १४, रा. शिवाजीनगर हुडको, जळगाव) असे आहे. ती आपल्या वडील, आजी-आजोबा, लहान भाऊ आणि बहीण यांच्यासह राहत होती. गुरुवारी संध्याकाळी पाणी आल्याने घरातील पाण्याची मोटार सुरू होती. त्याच वेळी सोनलने मोटारीला स्पर्श केला असता तीला विजेचा तीव्र झटका बसला आणि तिने जागीच प्राण गमावले.

हा प्रकार पाहताच आजूबाजूच्या नागरिकांनी तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये आक्रोश आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी रुग्णालयात भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post