खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार |छत्रपती संभाजीनगर,
विजय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दगडोजीराव देशमुख महाविद्यालय (रौप्य महोत्सवी वर्ष २०२५) आणि मराठवाडा साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ४४ वे मराठवाडा साहित्य संमेलन वाळूज येथील विलासराव देशमुख साहित्यनगरी, दगडोजीराव देशमुख महाविद्यालय, बजाजनगर येथे १५ व १६ फेब्रुवारी २०२५ रोजी भव्य स्वरूपात पार पडणार आहे.
या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध कादंबरीकार डॉ. भीमराव वाघचौरे, तर स्वागताध्यक्ष विजय राऊत असतील. संमेलनामध्ये विविध परिसंवाद, चर्चासत्रे, ग्रंथदिंडी, कविसंमेलन, कथाकथन, बालकुमार मेळावा, विशेष संवाद व चित्रकला कार्यशाळा असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम होणार आहेत. साहित्य रसिकांना दोन दिवस रंगतदार साहित्य मेजवानी मिळणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन सोहळा
शनिवार, १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० ते १:०० या वेळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचारपीठावर संमेलनाचे उद्घाटन होईल.
उद्घाटनकर्ता:
मा.ना. उदय सामंत (मंत्री, मराठी भाषा विभाग व उद्योग, महाराष्ट्र राज्य)
प्रमुख उपस्थिती:
मा.ना. संजय शिरसाट (मंत्री, सामाजिक न्याय तथा पालकमंत्री, छत्रपती संभाजीनगर)
मा.ना. अतुल सावे (मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, महाराष्ट्र राज्य)
मा.आ. अमित विलासराव देशमुख (माजी मंत्री, वैद्यकीय शिक्षण, महाराष्ट्र राज्य)
सूत्रसंचालन: डॉ. समाधान इंगळे
आभार: प्राचार्य डॉ. राहुल हजारे
पहिल्या दिवसाचे कार्यक्रम (१५ फेब्रुवारी २०२५)
सकाळी:
८:३० ते ९:३० – ग्रंथदिंडी (उद्घाटन: मा. चेतन राऊत)
१०:०० – ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन (डॉ. जगदीश कदम यांच्या हस्ते)
१:०० ते २:०० – भोजन अवकाश
दुपार व संध्याकाळ:
परिसंवाद १: ‘सामाजिक अस्वस्थतेमागील खदखद: जातीची की मातीची?’
अध्यक्ष: डॉ. साहेब खंदारे
सहभागी: डॉ. मुस्तजीब खान, उत्तम बावस्कर, डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. दलाहरी होनराव, डॉ. शैलजा वरूरे, डॉ. दुष्यंत कटारे
सूत्रसंचालन: डॉ. रमेश औताडे
परिसंवाद २: ‘मराठवाड्यातील साहित्य: नवे भान, नव्या वाटा!’
अध्यक्ष: डॉ. वसंत बिरादार
सहभागी: डॉ. महेश खरात, डॉ. वैजिनाथ अनमुलवाड, डॉ. मुंजाभाऊ धोंडगे, प्रा. सुरेंद्र पाटील, डॉ. रमेश रावळकर
सूत्रसंचालन: डॉ. जयप्रकाश चोरघडे
परिचर्चा: ‘भारतीय संविधान’
सहभागी: डॉ. प्रल्हाद लुलेकर, अॅड. राज कुलकर्णी, अॅड. सुषमा अंधारे, मुक्ता कदम
संवादक: श्रीरंजन आवटे, राहुल कोसंबी
परिसंवाद ३: ‘सामाजिक अधोगतीला संत विचारच तारेल!’
अध्यक्ष: प्रा. राम रौनेकर
सहभागी: मार्तंड कुलकर्णी, रवींद्र केसकर, डॉ. सोपान सुरवसे, अनिल देशमुख, डॉ. रूपेश मोरे
सूत्रसंचालन: गणेश घुले
कविसंमेलन: (सायं. ७:०० ते १०:००)
अध्यक्ष: संजय वरकड
सहभागी: शिवाजी मरगीळ, संजीवनी तडेगावकर, प्रिया धारूरकर, अरुण पवार, नारायण पुरी, ज्योती कदम, प्रमोद माने जकेकूरकर, आशा डांगे आणि अन्य सुप्रसिद्ध कवी
दुसऱ्या दिवसाचे कार्यक्रम (१६ फेब्रुवारी २०२५)
सकाळी:
९:३० ते ११:३० – मुलाखत कार्यक्रम
लेखक: मा. शाहू पाटोळे
संवादक: गीतांजली कुलकर्णी, भूषण कोरगावकर
सूत्रसंचालन: डॉ. दिलीप बिरुटे
११:३० ते १:३० – विशेष संवाद: ‘समाज, साहित्य आणि चित्रपट व मालिका’
अध्यक्ष: अरविंद जगताप
सहभागी: डॉ. गणेश चंदनशिवे, गीतांजली कुलकर्णी, चिन्मयी सुमित
सूत्रसंचालन: प्रा. डॉ. समाधान इंगळे
११:३० ते १:३० – परिसंवाद ४: ‘मराठी अभिजात झाली… पण पुढे काय?’
अध्यक्ष: डॉ. नानासाहेब सूर्यवंशी
सहभागी: प्रा. राजाराम झोडगे, डॉ. भाऊसाहेब राठोड, डॉ. केदार काळवणे, प्रा. राजक्रांती वळसे, डॉ. शिवानंद भानुसे
दुपार व संध्याकाळ:
२:०० ते ५:०० – कथाकथन
अध्यक्ष: राम निकम
सहभागी: नागनाथ पाटील, डॉ. भास्कर बडे, अर्जुन व्हटकर, मेघना मनगटे, अंबादास केदार
२:०० ते ५:०० – बालकुमार मेळावा
अध्यक्ष: गेणू शिंदे
सहभागी: श्रीपती जमाले, निशा कापडे, विनोद सिनकर, संजय ऐलवाड, किरण निकम
५:०० ते ७:०० – समारोप सोहळा
अध्यक्ष: डॉ. भीमराव वाघचौरे
प्रमुख पाहुणे: मा.ना. अंबादासजी दानवे
विशेष उपस्थिती: अरविंद जगताप
विशेष कार्यक्रम:
चित्रकला कार्यशाळा व चित्रप्रदर्शन (१५ व १६ फेब्रुवारी)
उद्घाटक: बैजू पाटील (वन्यजीव छायाचित्रकार)
प्रमुख सहभाग: राजू बाविस्कर (चित्रकार)
साहित्यप्रेमींना आग्रहाचे आमंत्रण
साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठवाडा साहित्य संमेलनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष विजय राऊत आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------