खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव, क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पाचोरा येथील २४ वर्षीय तरुणाची तब्बल ९ लाख १२ हजार ११४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप आणि टेलीग्रामच्या माध्यमातून संपर्क साधून ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ११ फेब्रुवारी रोजी रात्री जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
व्हॉट्सअॅप आणि टेलीग्रामवरून संपर्क साधून फसवणूक
प्रगत गोपाल गाडीलोहार (वय २४, रा. पाचोरा) यांना ३ फेब्रुवारी रोजी अज्ञात व्यक्तींनी व्हॉट्सअॅप आणि टेलीग्रामवरून संपर्क केला. त्यांनी क्रिप्टो ट्रेडिंगच्या टास्कद्वारे मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
सुरुवातीला, प्रगत यांनी ४,०३० रुपये गुंतवले, त्यावर त्यांना ५,८३९ रुपयांचा परतावा मिळाला. या परताव्यावर विश्वास ठेवल्याने त्यांनी टप्प्याटप्प्याने एकूण ९,१२,११४ रुपये गुंतवले. मात्र, त्यानंतर त्यांना कुठलाही परतावा मिळाला नाही. पैसे अडकल्याचे लक्षात आल्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी त्यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सायबर पोलिसांचा तपास सुरू
तक्रारीच्या आधारे अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सतिष गोराडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सायबर पोलिसांनी नागरिकांना अनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाला बळी न पडण्याचा आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तींकडून आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
संदिग्ध प्लॅटफॉर्म आणि अनोळखी गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी योग्य पडताळणी करावी, अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, असेही आवाहन करण्यात आले आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
सायबर क्राईम