खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज आणि प्रसिद्ध व्याख्याते ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी आज सकाळी देहू येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या या आकस्मिक निधनामुळे देहू गावात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी उपरण्याच्या सहाय्याने गळफास घेतला. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आर्थिक अडचणींचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता आणि २० फेब्रुवारीला विवाह होणार होता. त्यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे.
शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते आणि शिवव्याख्याते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
दुःखद निधन