खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव – इस्लामपुरा भागातील एका बंदिस्त जागेत कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या १७ गोवंश जनावरांची शनिपेठ पोलिसांनी यशस्वी सुटका केली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त माहितीवरून पोलिसांची कारवाई
जळगाव पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी अवैध गोवंश तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना इस्लामपुरा भागातील एका बंदिस्त जागेत मोठ्या प्रमाणावर गोवंश जनावरे कत्तलीसाठी आणून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे, बुधवारी (१२ फेब्रुवारी) सकाळी ५.३० वाजता पोलिसांनी के. के. उर्दू हायस्कूलच्या मागील दोन बंदिस्त ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी त्या ठिकाणी कत्तलीसाठी बांधून ठेवलेली १७ गोवंश जनावरे (किंमत अंदाजे ₹१.७० लाख) जप्त केली.
दोन आरोपींवर गुन्हा दाखल
या कारवाईत शेख इब्राहीम अब्दुल कुरेशी (वय ३३, रा. इस्लामपुरा, मदीना मशीद जवळ, जळगाव) आणि सादीक मेहमुद खान (वय २९, रा. इस्लामपुरा, भवानीपेठ, जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुटका केलेल्या जनावरांचे संगोपन
सुटका केलेल्या जनावरांना महानगरपालिका जळगावच्या कोंडवाड्यात तात्पुरते ठेवण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी श्री. चोपडे यांनी त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर पुढील संगोपनासाठी आर. सी. बाफना गौशाळा, कुसुंबा येथे त्यांना हलवण्यात आले.
पोलीस पथकाची महत्त्वपूर्ण भूमिका
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांच्या सोबत पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, हवालदार विजय खैरे, गिरीश पाटील, किरण वानखेडे, गजानन वाघ, शिपाई पराग दुसाने तसेच कंपनी नायक अनिल पाटील आणि १० होमगार्ड कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
जळगाव पोलीस प्रशासनाने अवैध गोवंश तस्करीविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------