रामानंद नगर पोलिसांची मोठी कामगिरी – एकाच वेळी ८ घरफोड्या उघड, ५ सराईत गुन्हेगार जेरबंद; ८ लाखांचे सोने, ६० हजारांची चांदी आणि LED टीव्हीसह मुद्देमाल हस्तगत



खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव: रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या सातत्यपूर्ण घरफोड्यांच्या घटनांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत तब्बल ८ घरफोड्या उघडकीस आणत ५ सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले. या कारवाईत १० तोळे सोने, ६५० ग्रॅम चांदी आणि LED टीव्हीसह एकूण ८.७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विशेष मोहिमेत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

रामानंद नगर पोलिसांच्या हद्दीत वारंवार घरफोड्यांच्या घटना घडत असल्याने मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलिसांनी तपासाला वेग दिला.

या मोहिमेअंतर्गत गुप्त माहितीच्या आधारे सागर शिवराम डोईफोडे या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ६ घरफोड्यांची कबुली दिली.

घरफोड्यांचे उलगडलेले गुन्हे:

१) CCTNS No.14/2025 – भारतीय न्याय संहिता कलम 305 (अ), 331(3), 331(4)
२) CCTNS No.338/2024
३) CCTNS No.294/2024
४) CCTNS No.04/2025
५) CCTNS No.42/2025
६) CCTNS No.43/2025

यातील चोरी गेलेल्या मालापैकी १० तोळे सोने आणि ६५० ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे.

अजून चार साथीदारांना अटक

सागर डोईफोडेच्या चौकशीत आणखी चार साथीदारांची नावे उघडकीस आली. त्यानंतर १) नितेश मिलींद जाधव, २) दिपक विनोद आढाळे, ३) रवि भागवत सोनवणे आणि ४) अनिल ऊर्फ मारी भगवान सोनवणे यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी CCTNS No.344/2024 आणि CCTNS No.362/2024 या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून LED टीव्ही आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त केलेला मुद्देमाल:

१० तोळे सोने – अंदाजे किंमत ₹८,००,०००/

६५० ग्रॅम चांदी – अंदाजे किंमत ₹६०,०००/

LED टीव्ही आणि इतर मुद्देमाल – अंदाजे किंमत ₹१०,०००/


अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध कारवाई

ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने तपास करून आरोपींना अटक केली.

कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी:

सफौ/संजय सपकाळे
पोहेकॉ जितेंद्र राजपूत
पोहेकॉ जितेंद्र राठोड
पोहेकॉ सुशिल चौधरी
पोहेकॉ इरफान मलिक
पोना/हेमंत कळसकर
पोना/रेवानंद साळुखे
पोना/विनोद सुर्यवंशी
पोशि/रविंद्र चौधरी
पोशि/उमेश पवार

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विठ्ठल पाटील आणि पोउपनि प्रदीप बोरुडे करीत आहेत.

रामानंद नगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी – गुन्हेगारीवर आळा!

या कारवाईमुळे जळगाव शहरातील वाढत्या घरफोड्यांच्या गुन्ह्यांवर मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, स्थानिक पोलिसांचे कौतुक होत आहे.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post