खबर महाराष्ट्र न्युज, प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहिम आखली. मा. पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदिप गावीत यांनी पोलिसांना योग्य सूचना व मार्गदर्शन केले.
गुप्त माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई
या अनुषंगाने, एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका संशयित व्यक्तीकडे चोरीची मोटार सायकल असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक श्री संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक श्री राहुल तायडे, उपनिरीक्षक श्री चंद्रकांत धनके, तसेच पोलीस कर्मचारी प्रदीप चौधरी, विकास सातदिवे, रतन गिते, राहुल घेटे, योगेश बारी आणि योगेश घुगे यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले.
आरोपीला अटक – मोठा गुन्हा उघड
पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून संशयित विक्की नंदलाल भालेराव (वय-२८, रा. वाघ नगर, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने बहिणाबाई उत्सव दरम्यान सागर पार्क, जळगाव येथून एक मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.
पुढील तपासात आरोपीने कबूल केले की, त्याने जळगाव शहरातील जिल्हा पेठ, रामानंद नगर, एम.आय.डी.सी., तसेच धुळे जिल्ह्यातील मोहाडी भागातून एकूण १५ मोटार सायकली चोरल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ₹७,५०,०००/- आहे.
९ गुन्ह्यांचा उलगडा – पुढील तपास सुरू
या तपासादरम्यान, एकूण ९ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले. त्यामध्ये –
एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन – २ गुन्हे
जिल्हा पोलीस स्टेशन – ३ गुन्हे
रामानंद नगर पोलीस स्टेशन – ३ गुन्हे
मोहाडी पोलीस स्टेशन, धुळे – १ गुन्हा
पोलिसांकडून इतर चोरीच्या मोटार सायकल्सचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. यासाठी पोलीस उपनिरीक्षक श्री चंद्रकांत धनके, पोना/विकास सातदिवे, पोना/प्रदिप चौधरी, पोकों/रतन गिते हे अधिक तपास करत आहेत.
पोलीस प्रशासनाचे विशेष योगदान
या संपूर्ण कारवाईत मा. पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदिप गावीत यांच्या नेतृत्वाखाली एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्वपूर्ण भूमिका बजावली. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
क्राईम