खबर महाराष्ट्र न्युज, | वरणगाव, ता. भुसावळ – वरणगाव शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर महात्मा गांधी विद्यालयाजवळ गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोन जणांना वरणगाव पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी, १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता करण्यात आली. आरोपींकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि बुलेट मोटारसायकल असा एकूण ९९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुप्त माहितीवरून पोलिसांची कारवाई
वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांना माहिती मिळाली होती की, रेल्वे स्टेशन रोडवरील महात्मा गांधी विद्यालयासमोरील एका टपरीजवळ दोन तरुण बुलेट मोटारसायकलवर गावठी पिस्तूल बाळगून दहशत निर्माण करत आहेत. यावर पोलिसांनी तत्काळ कारवाईसाठी पथक रवाना केले.
गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता पोलिसांनी छापा टाकत संशयित आरोपी आदेश ज्ञानेश्वर भैसे (वय १९, रा. आंबेडकरनगर, वरणगाव) आणि गौरव संतोष इंगळे (वय २०, रा. वामन नगर, वरणगाव) यांना अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि बुलेट मोटारसायकल (क्रमांक एम.१२.डी.एन. ९०९७) असा एकूण ९९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पिस्तूल कुठून आले? आरोपींची कबुली
अटक करण्यात आलेल्या आदेश भैसेने चौकशीत सांगितले की, त्याने आणि सोनू सुनील भालेराव यांनी एक महिना पूर्वी चोपडा येथून सागर नावाच्या व्यक्तीकडून २० हजार रुपयांना हे गावठी पिस्तूल खरेदी केले होते.
गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गोपीचंद शेनफडू सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार नागेंद्र सिताराम तायडे करीत आहेत.
या घटनेने वरणगाव शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी अवैध शस्त्रसाठ्याचा तपास सुरू केला आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------