खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - कासोदा पोलिसांनी जुगारअड्ड्यावर छापा टाकत पत्त्याच्या खेळात गुंतलेल्या १५ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹१,२१,३९० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ₹६,३९० रोख रक्कम आणि ₹१,१५,००० किमतीच्या दोन मोटारसायकल्सचा समावेश आहे.
सहायक पोलीस निरीक्षक श्री. निलेश दिवानसिंग राजपुत यांना जवखेडे सिम गावाजवळील गालापूर रोडलगतच्या काटेरी झुडपांआड काही इसम पत्त्याचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस कर्मचारी प्रदिप पाटील, समाधान तोंडे, निलेश गायकवाड, योगेश पाटील यांना तत्काळ पथकासह कारवाईसाठी पाठवले.
पोलीस पथकाने ठिकाणी धाड टाकली असता, काही इसम जमिनीवर बसून घोळका करून पत्त्याचा खेळ खेळताना आढळून आले. सुमारे ३ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास कारवाई करत सर्वांना ताब्यात घेण्यात आले.
पकडण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे व वय पुढीलप्रमाणे –
१. सोनू धाकू भिल (५०)
२. विरभान श्रावण भिल (४०)
३. राहुल संतोष सोनवणे (२६)
४. प्रविण वसंत सोनवणे (३९)
५. संतोष माधव सोनवणे (३०)
६. सुनील दगा ठाकरे (३५)
७. मंगीलाल भाईदास चव्हाण (४५)
८. रतन धाकू भिल (६०)
९. अशोक गोविंदा पाटील (५४)
१०. सचिन बापू पवार (३७)
११. कांतीलाल महादू सोनवणे (३८)
१२. उत्तम बाळाआप्पा जेहें (५०)
१३. समाधान बापू पाटील (३५)
१४. संभाजी महारू पाटील (५८)
१५. सुनील सिताराम वाघ (४८)
– सर्व रा. जवखेडे सिम, ता. एरंडोल, जि. जळगाव
यांच्या अंगझडतीतून रोख रक्कम व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून पो.कॉ. दीपक देसले यांच्या फिर्यादीवरून सर्वांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सौ. नेरकर मॅडम, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सपोनि निलेश राजपूत, पो.हे.कॉ. नंदलाल परदेशी, पो.ना. प्रदीप पाटील, पो.कॉ. समाधान तोंडे, निलेश गायकवाड, योगेश पाटील, कुणाल देवरे, दीपक देसले, कॉल्हू हटकर यांनी सहभाग घेतला.
Tags
जळगाव