खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - शहरालगतच्या एमआयडीसी परिसरातील जगवाणी नगर येथे १६ एप्रिल २०२५ रोजी रात्री दुकान क्रमांक ०४ चे शटर वाकवून १.८५ लाख रुपयांच्या जुना व नव्या तांब्याच्या तारा चोरीस गेल्या होत्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
विशेष गुन्हे शोध पथकाच्या तपासादरम्यान २ मे रोजी दोन आरोपींना अटक झाली, मात्र शिकवणसिंग बरियामसिंग उर्फ पटमलसिंग टाक हा फरार होता. गुप्त माहितीच्या आधारे ४ ऑगस्ट रोजी वाघनगर परिसरातून त्याला सफौ. विजयसिंग पाटील व पो.ना. प्रदीप चौधरी यांनी ताब्यात घेतले.
पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपीकडून ५० किलो वजनाचे, अंदाजे २७ हजार रुपये किमतीचे तांब्याचे तार हस्तगत करण्यात आले. मुद्देमाल जप्त करून पुढील तपास पो.उ.नि. राहुल तायडे व पोकों. निलेश पाटील करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप अधीक्षक संदीप गावीत व पो.नि. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
Tags
जळगाव