खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भुसावळ तालुक्यात मोठी कारवाई करत दोन पोलिस कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीविरुद्ध न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. हे वॉरंट तत्काळ अंमलात आणण्याऐवजी मुदतवाढ मिळवून देण्यासाठी संबंधित दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी दोन हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याची माहिती जळगाव एसीबी कार्यालयाला दिल्यानंतर पथकाने पडताळणी केली आणि नियोजित सापळा रचला.
सापळा रचताना, तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना एसीबीने ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, मनपा लिपिकाच्या अटकेनंतर अवघ्या काही दिवसांतच पुन्हा पोलिस दलातील भ्रष्टाचार उघड झाल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.
Tags
जळगाव