खबर महाराष्ट्र न्युज,जळगाव | शिव कॉलनीतील रहिवासी योगेश गोविंद चंदनकर (वय ५२) यांचा डंपरच्या धडकेत गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी मृत्यूपश्चात नेत्रदानाचा निर्णय घेऊन माणुसकीचा आदर्श ठेवला.
चंदनकर यांची कंपनी एमआयडीसी परिसरात आहे. १ ऑगस्ट रोजी ते दुचाकीवरून कंपनीकडे जात असताना अजिंठा चौफुली येथे त्यांच्या दुचाकीला भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या पायावरून चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना सोमवारी, ५ ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
दुर्दैवी मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत नेत्रदानाचा निर्णय घेतला.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
निधन वार्ता