खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव : जळगाव जिल्हा १३ वर्षाखालील मुला-मुलींसाठी जिल्हा बास्केटबॉल संघ निवड चाचणीचे आयोजन दिनांक ३१ ऑगस्ट २०२५, रविवार रोजी करण्यात आले आहे. ही निवड चाचणी पाचोरा येथील एम.एम. महाविद्यालयातील पाचोरा बास्केटबॉल ग्रुपच्या मैदानावर सकाळी १० वाजता होणार आहे.
या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी खेळाडूंचा जन्म दिनांक ०१ जानेवारी २०१२ नंतरचा असणे आवश्यक आहे. निवड चाचणीसाठी उपस्थित राहताना खेळाडूंनी स्वतःचे आधार कार्ड, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र व वयाचा दाखला यांच्या साक्षांकित प्रती सोबत आणणे बंधनकारक आहे.
या निवड प्रक्रियेतून निवडलेला जळगाव जिल्हा संघ महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेतर्फे आयोजित १३ वर्षाखालील आंतरजिल्हा राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत सोलापूर येथे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. जितेंद्र शिंदे आणि श्री. निलेश पाटील यांनी केले आहे. तर ही माहिती श्री. जयंत देशमुख (सहसचिव, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना) यांनी कळविली आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
खेळ