नाथाभाऊंना बदनाम करण्याच्या प्रयत्नांवर राष्ट्रवादीचा हल्ला, खडसे समर्थनार्थ दुग्धाभिषेक आंदोलन

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व विद्यमान विधान परिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या कथित खोट्या आरोपांप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे आज दि. 9 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता जळगाव शहरात निषेध आंदोलन करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, रूपाली चाकणकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा खोटा कांगावा करून, तसेच भाजप व हनीट्रॅप प्रकरणाच्या माध्यमातून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि नाथाभाऊंना कोणत्याही मार्गाने बदनाम करण्यासाठी महायुतीच्या नावाने 8 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान खडसे यांच्या प्रतिमेला शाही व काळे फासण्याचा प्रकार घडला.

या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) कडून शहरात निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली व खडसे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून समर्थन दर्शवले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील, युवक शहराध्यक्ष रिकू चौधरी, माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजरी, सुनील माळी, मजहर पठाण, राजू मोर, रिझवान खाटीक, इब्राहिम तडवी, जयप्रकाश चांग्रे, किरण राजपूत, भगवान सोनवणे, प्रमोद पाटील, कलाबाई सिरसाठ, संजय पाटील, आशिफ शेख, आकाश हिवाळे, चेतन पवार, संजय जाधव, सुहास चौधरी, अमजद खाटीक, इम्रान खान, फारुक शेख, कैलास पाटील, रफिक पटेल, भल्ला तडवी, गणेश पाटील, प्रभाकर माळी, अविनाश माहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने अशा खोट्या व बदनामीकारक राजकारणाचा निषेध नोंदवत, नाथाभाऊंना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post