◆ जळगाव जिल्हा बास्केटबॉल संघ निवड चाचणी उत्साहात संपन्न ◆

खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | पाचोरा (जि. जळगाव) –
रविवार, दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी १३ वर्षाखालील मुले व मुलींची जळगाव जिल्हा बास्केटबॉल संघ निवड चाचणी पाचोरा येथील एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या बास्केटबॉल मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या निवड चाचणीचे उद्घाटन पाचोरा तालुका तहसीलदार श्री. विजय शिवाजी बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, सहसचिव प्रा. वी.टी. जोशी, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, क्रीडासंचालक प्रा. गिरीश पाटील तसेच श्री. विकास सूर्यवंशी (महाराष्ट्र पोलीस) यांची विशेष उपस्थिती लाभली.

जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून तब्बल ४० मुले व ३२ मुली या स्पर्धेत सहभागी झाल्या. निवड समितीत श्री. लौकिक मुंदडा, श्री. जावेद शेख, श्री. वसीम शेख, श्री. जितेंद्र शिंदे, श्री. नीलेश पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. समितीच्या निर्णयानुसार १७ मुले व १७ मुलींचा संभाव्य जिल्हा संघ जाहीर करण्यात आला आहे.

संभाव्य संघाचे सराव शिबिर मुलांसाठी पाचोरा येथे तर मुलींसाठी जळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरामधून अंतिम १२ मुले व १२ मुलींची संघ रचना निश्चित केली जाईल. निवड झालेला अंतिम संघ महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेतर्फे आयोजित आंतरजिल्हा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही स्पर्धा दि. १० ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान सोलापूर येथे होणार आहे.

निवड चाचणी यशस्वीतेसाठी श्री. दिनेश पाटील, श्री. सचिन भोसले, श्री. आशिष पाटील, श्री. भावेश पाटील, श्री. विजय बेंडाळे, श्री. मयूर लाहोरी तसेच पाचोरा बास्केटबॉल ग्रुपचे सर्व सदस्य यांनी मोलाचे योगदान दिले.

संभाव्य मुलींचा संघ

आराध्या कीर्तने, राज्यलक्ष्मी भोईटे, मोक्षदा सोनवणे, रोसी दास, तिथी जैन, आराध्या पाटील, शरण्या शिंदे, कल्याणी चौधरी, राजश्री चव्हाण, लक्ष्मी हटकर, खुशी अहिरराव, रिद्धी ठाकूर, श्रद्धा साखरे, श्रावणी पाटील, तेजस्वी बनसोडे, लक्ष्मी येवले, रिद्धी काळे.

संभाव्य मुलांचा संघ

यजुर्वेंद्र शिवदे, राज पाटील, गणेश पाटील, हर्ष जयस्वाल, संकेत मांडवे, उमर शेख, मंथन अहिरे, भाग्येश पाटील, विराज पाटील, अंश सपकाळ, लोकेश भोळे, रोहित पाटील, सत्यजित महाजन, मयुरेश चौधरी, सत्यम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, यजत गोमासे.

जळगाव जिल्हा संभाव्य संघाची घोषणा पाचोरा बास्केटबॉल ग्रुपचे आश्रयदाते व महाराष्ट्र पोलीस अधिकारी श्री. दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

✨ जळगाव जिल्ह्याचा अंतिम संघ आता राज्य अजिंक्यपदासाठी सज्ज होत असून, जिल्ह्यातील बास्केटबॉलप्रेमींमध्ये उत्सुकता व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post