४५ वर्षांची सामाजिक वाटचाल – ‘जिद्दी मित्र मंडळा’कडून शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रबोधनात्मक देखावा
खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जळगाव शहरातील प्रसिद्ध रथ चौकातील ‘जिद्दी मित्र मंडळा’चे यंदाचे ४५ वे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे होत असून, या विशेष वर्षानिमित्ताने मंडळाने एक वेगळाच सामाजिक संदेश देणाऱ्या सजीव देखाव्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या गंभीर आणि व्यथित करणाऱ्या विषयावर आधारित हा देखावा यंदाच्या गणेशोत्सवात सादर करण्यात येणार आहे.
गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर साकारला जाणारा हा देखावा प्रेक्षकांमध्ये निश्चितच जनजागृती निर्माण करेल, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे. शेतीमधील संकटं, कर्जबाजारीपणा, निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान आणि शासनाच्या अपुर्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी या सजीव देखाव्यात मांडण्यात येणार आहेत.
४५ वर्षांची सामाजिक वाटचाल
‘जिद्दी मित्र मंडळ’ केवळ देखावे सादर करणाऱ्या मंडळांपैकी एक नसून, गेल्या चार दशकांहून अधिक काळ सामाजिक कार्यातही अग्रभागी राहिले आहे. दरवर्षी गणेशोत्सवात जनजागृतीपर देखावे, पर्यावरण पूरक उपक्रम, रक्तदान शिबिरं, स्वच्छता मोहिमा अशा अनेक उपक्रमांद्वारे मंडळाने समाजाशी आपला दृढ नातेसंबंध कायम ठेवला आहे.
कार्यकारिणी समिती (२०२५)
मंडळाची कार्यकारिणी देखील उत्साहात काम करत असून यामध्ये पुढील पदाधिकारी आणि सदस्यांचा समावेश आहे:
संस्थापक अध्यक्ष : मुनेश सुपडू बारी
अध्यक्ष : भालचंद्र वाणी
उपाध्यक्ष : शरद चव्हाण
सचिव : मयूर यूर बारी
खजिनदार : दिनेश माने
सदस्य : अतुल कासार, जगदीश निकम, उदय शिंपी, रवींद्र ठाकूर, जितेंद्र भामरे, संजय वाणी, उज्ज्वल देवरे, गिरीश वाणी, गणेश शिंपी, महेंद्र भामरे, यतीन परदेशी, निशांत अग्रवाल, मनीष वाणी
यंदाचा गणेशोत्सव ‘जिद्दी मित्र मंडळा’साठी सामाजिक बांधिलकी आणि प्रबोधनाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. मंडळाच्या या उपक्रमाचे शहरभर कौतुक होत असून, गणपतीच्या दर्शनासोबतच नागरिकांनी हा देखावा अनुभवावा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
जळगाव