जळगाव एलसीबीची दमदार कारवाई
खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - गुजरात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, आर्म अॅक्टसह गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेला आणि बराच काळ फरार असलेला आरोपी भुसावळमध्ये लपल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थागुशा जळगावच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.
साहील उर्फ सलीम पठान (वय २१, रा. भाटिया गाव, हाजीपुरा, सचिन, जि. सुरत, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आज दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता भुसावळ शहरातील नहाटा चौफुलीजवळील हायवेवर ही कारवाई करण्यात आली.
सदर आरोपीविरोधात तापी व्यारा सेशन कोर्टात गुन्हा क्र. ४२/२०२४ अंतर्गत भादंवि कलम ३९४, ३९७, ३४२, ३२३, ५०४(२), ३४, १२०(ब) तसेच आर्म अॅक्ट २५(१) आणि जी. पी. अॅक्ट १३५ अन्वये गंभीर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय गुजरातमधील विविध पोलीस ठाण्यांमध्येही त्याच्याविरोधात गुन्ह्यांची नोंद आहे. अटक केलेल्या आरोपीस वैद्यकीय तपासणीनंतर निझर पोलीस स्टेशन, सुरत (गुजरात) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पो.उपनिरीक्षक शरद बागल, श्रे. पो.उनि. रवि नरवाडे, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, पोना विकास सातदिवे, पोकों प्रशांत परदेशी व राहुल वानखेडे यांनी सहभाग घेतला.
Tags
जळगाव