खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पाळधी येथे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर मोठी छापा कारवाई केली असून, या कारवाईत १६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून एकूण १२,२४,२६०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात रोख रक्कम ७,२२,२६० रुपये व विविध कंपनीचे एकूण ५,०२,००० रुपये किंमतीचे मोबाईल फोन यांचा समावेश आहे.
आज दि. ०९ सप्टेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पाळधी येथे जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. यानंतर तत्काळ पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस अंमलदार अक्रम शेख, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, नितीन बावीस्कर, सलीम तडवी, विनोद पाटील, विजय पाटील, रविंद्र चौधरी, रविंद्र कापडने, सिध्देश्वर डापकर, राहुल रगडे, रतन गिते, मयुर निकम, भारत पाटील, महेश सोमवंशी, प्रमोद ठाकूर यांचा समावेश होता.
पथकाने पाळधी येथील शाम कॉलनीतील एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत १६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (चोपडा उपविभाग) अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, जळगावच्या पथकासोबतच पाळधी दुय्यम पोलीस केंद्राचे सपोनि प्रशांत कंडारे, पोलीस अंमलदार अमोल धोबी, रविंद्र चौधरी यांनीही सक्रिय सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे अवैध जुगार अड्ड्यांवर वचक बसला असून, पुढील तपास सुरू आहे.
Tags
Jalgaon