जळगाव गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ट्रकमधून १ कोटींचा गुटखा जप्त

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी कारवाई करून अवैधरित्या वाहतूक होत असलेला तब्बल ₹१ कोटी २ लाख ३३ हजारांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाईनंतर अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

राज्यात प्रतिबंधित गुटखा मध्यप्रदेशातून छत्रपती संभाजीनगरकडे नेला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ सलीम तडवी, छगन तायडे, रतन गिते, मयूर निकम व भरत पाटील यांच्या पथकाने सारोळा फाट्यावर नाकाबंदी करून ट्रकला थांबवले. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर गुटखा सापडल्याने तो जप्त करण्यात आला.

या प्रकरणी ट्रकचालक आशिष राजकुमार जयस्वाल (रा. भमोरी, देवास, मध्यप्रदेश) व त्याचा साथीदार आशिफ खान बुल्ला खान (रा. शिवशक्ती नगर, नागपूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यप्रदेशातून निघालेला हा ट्रक जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना पोलिसांच्या कारवाईत सापडला. या धाडसी कारवाईनंतर गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यास हातभार लागला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post