सहा बहिणींचा एकुलता एक भाऊ अपघातात गमावला, १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - जुन्या महामार्गावर शुक्रवारी (१२ सप्टेंबर) दुपारी सुमारास घडलेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हुजेब राऊत खाटीक (वय १९, रा. वरणगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, तो आपल्या सहा बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हुजेब नमाज पठणासाठी पायी जात असताना दिपनगर २१० गेटजवळील चिकन दुकानासमोर अपघात घडला. एमएच १९ आर ९५२६ क्रमांकाच्या दुचाकीने त्याला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय ट्रॉमा सेंटरमध्ये पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ग्रामस्थांकडून मदतीची मागणी
हुजेबच्या निधनामुळे कुटुंबाचा आधारच हरपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने प्रशासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post