पोलिसांची मोठी कारवाई: ५४ हजारांच्या १८ तलवारी जप्त, पाचोऱ्यात अवैध शस्त्रसाठा जप्त

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - पाचोरा पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी रात्री शहरातील माहिजी नाका परिसरातून एका व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात तलवारी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल शेख तय्युब शेख (वय २४, रा. बाहेरपुरा, पाचोरा) याला अवैधरित्या तलवारी बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एकूण १८ तलवारी जप्त करण्यात आल्या असून, त्यांची किंमत सुमारे ५४ हजार रुपये आहे.

गुप्त माहितीवरून कारवाई
पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना गुप्त बातमीदाराकडून सोहेल शेख तलवारी विकण्यासाठी पाचोऱ्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला पकडले. चौकशीदरम्यान, सोहेलने तलवारी बाळगल्याची कबुली दिली आणि लपवलेल्या तलवारींचे ठिकाण दाखवले. त्याने काही तलवारी आधीच विकल्याचेही सांगितले.

याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर रोजी भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार आणि त्यांच्या टीमने केली. या पथकात पोउपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पोउपनिरीक्षक कैलास ठाकुर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत, जितेंद्र पाटील आणि हरीष परदेशी यांचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post