खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - शहरातील एमआयडीसी परिसरातील एच सेक्टरमधील हॉटेल तारा येथे सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून हॉटेल मालक योगेश देवरे, दोन कर्मचारी आणि दोन ग्राहक अशा पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीयू पथकाने सापळा रचला होता. बनावट ग्राहकाला आत पाठवून निश्चित सिग्नल (लाईट दोन वेळा चालू-बंद) मिळाल्यावर पथकाने धाड टाकली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Tags
जळगाव