खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - महाबळ परिसरात बुधवारी (६ ऑगस्ट) दुपारी एक दुर्दैवी घटना घडली. भावना राकेश जाधव (वय ७१) या वृद्ध महिलेचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
दररोजच्या प्रमाणे भावना जाधव आपल्या घराबाहेर कपडे सुकवण्यासाठी टाकलेल्या तारांची पाहणी करत होत्या. यावेळी कपडे काढत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. आवाज आणि धक्का लक्षात येताच घरातील सदस्य तसेच शेजारी घटनास्थळी धावले. तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या अपघातामुळे जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वृद्ध महिलेचा असा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. कुटुंबियांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गाठून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली.
दरम्यान, रामानंद नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद घेण्याचे काम सुरू असून विजेच्या तारा किंवा वायरिंगमधील बिघाडामुळेच हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Tags
जळगाव