जळगावात ३७ वर्षीय तरुणाची आत्महत्या, एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - नेहरू नगर परिसरात राहणाऱ्या नानक कन्हैयालाल सोढाई (वय ३७) यांनी स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. १४ जुलै) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नानक सोढाई हे रविवारी रात्री आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. त्यांनी खोलीचा दरवाजा आतून बंद केला होता. मात्र सोमवारी दुपारपर्यंत त्यांनी दरवाजा न उघडल्याने त्यांच्या भावजयीने काळजीपोटी दरवाजा ठोठावला. आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता नानक यांनी गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

घटनेची माहिती तातडीने त्यांच्या पतीला दिल्यानंतर नानक यांचा भाऊ त्वरित घरी पोहोचला आणि नानक यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post