जळगाव रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

जिल्हा पोलीस दलासाठी १६ नव्या जीप; अधीक्षकांसाठी स्वतंत्र चारचाकी वाहन

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - 
जळगाव शहरातील रामानंद पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील, उपअभियंता गिरीश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

गेली अनेक वर्षे भाड्याच्या इमारतीत कार्यरत असलेले हे पोलीस स्टेशन आता सुमारे ४ कोटी रुपये खर्चून अवघ्या १५ महिन्यांत बांधलेल्या स्वतंत्र व 'कॉर्पोरेट लूक' असलेल्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे.

कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “पोलीस दलाच्या कार्यक्षमतेसाठी भौतिक सुविधा महत्त्वाच्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बीट हवालदारांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत वाहनांचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम व वेगवान होणार आहे.”

यानंतर जिल्हा पोलीस दलासाठी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या १६ जीप आणि अधीक्षकांसाठी स्वतंत्र चारचाकी वाहनांचा लोकार्पण समारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. २ कोटी १२ लाख रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेल्या वाहनांचा वापर आजपासून सुरू झाला.

Post a Comment

Previous Post Next Post