खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - मनपा आरोग्य अधिकारी डॉ. घोलप यांच्या विरोधात अनेक तक्रारी असूनही अद्याप कार्यवाही न झाल्यामुळे आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी डॉ. घोलप यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली.
डॉ. घोलप यांच्या गैरवर्तणुकीबाबत चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरही कुठलीही कारवाई न झाल्याने शिष्टमंडळाने संताप व्यक्त केला. त्यांनी लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.
या शिष्टमंडळात शिवसेनेचे कुलभूषण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर प्रमुख एजाज मलिक, काँग्रेसचे महानगर प्रमुख शाम तायडे, माजी नगरसेवक प्रशांत नाईक, आरपीआय (आठवले गट) चे महानगरप्रमुख अनिल अडकमोल, युवासेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, महिला आघाडी महानगरप्रमुख मनीषा पाटील, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, माजी शहर संघटक राजेंद्र पाटील, प्रमोद घुगे, योगेश चौधरी, विजय राठोड, किरण भावसार, जितू बारी, सचिन चौधरी, योगेश पाटील, लोटण सोनवणे, ज्ञानेश्वर शेकाकुरे, भिमराव पांडव, गुलाब कांबळे, विशाल कोळी, किरण ठाकूर, प्रभाकर कोळी, बापु मेणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
जळगाव