मोठी बातमी I उज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती; राष्ट्रपतींच्या नामनिर्देशनातून मिळाली संधी

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - देशातील प्रख्यात सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींच्या नामनिर्देशनातून राज्यसभेसाठी निवड करण्यात आली आहे. विविध महत्त्वाच्या आणि गाजलेल्या खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलेल्या निकम यांना कायदा क्षेत्रातील योगदानासाठी ही मान्यता मिळाली आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता राज्यसभेवर त्यांची वर्णी लागली आहे.

राष्ट्रपतींनी एकूण चार नामवंत व्यक्तींना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले असून त्यात उज्वल निकम यांच्यासह खालील तिघांचा समावेश आहे:

हर्षवर्धन श्रृंगला – माजी परराष्ट्र सचिव

डॉ. मीनाक्षी जैन – ख्यातनाम इतिहास अभ्यासक

सी. सदानंदन मास्टर – केरळमधील प्रसिद्ध समाजसेवक आणि शिक्षणतज्ज्ञ

अ‍ॅड. उज्वल निकम – विशेष सरकारी वकील


अ‍ॅड. उज्वल निकम यांचे मूळगाव जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील माचले हे आहे. त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केलं, तर कायद्याचे शिक्षण जळगाव येथील एस. एस. मणियार लॉ कॉलेजमधून घेतले.

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. गुलशन कुमार हत्या प्रकरण, प्रमोद महाजन हत्या, 26/11 मुंबई हल्ला, कोपर्डी बलात्कार प्रकरण, आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून कामगिरी बजावली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post