युवा बास्केटबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव संघाची निवड प्रक्रिया सुरू

खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, संघटनांचे आवाहन

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - पुणे येथे दिनांक ९ ते १४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या १८ वर्षाखालील मुला आणि मुलींसाठी ७५ वी युवा आंतरजिल्हा राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाच्या निवडीसाठी जळगाव जिल्हा हौशि बास्केटबॉल असोसिएशन आणि जळगाव जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निवड चाचणी घेण्यात येणार आहे.

ही निवड चाचणी दिनांक २७ जुलै २०२५ रोजी (रविवार) दुपारी ३:०० वाजता पायोनियर स्पोर्ट्स क्लब, गणपती नगर, जळगाव येथे पार पडणार आहे. ज्या खेळाडूंचा जन्म १ जानेवारी २००७ नंतर झालेला आहे, असे खेळाडूच या निवड चाचणीत सहभागी होऊ शकतील.

सहभागी खेळाडूंनी आधार कार्डाची प्रत तसेच जन्म-मृत्यू नोंदणी विभाग (महानगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत) यांच्या मार्फत मिळालेले जन्म प्रमाणपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे.

जास्तीत जास्त खेळाडूंनी निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना सह सचिव जयंंत देशमुख, जळगाव जिल्हा हौशि बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव जितेंद्र शिंदे (मो. ९९२३१२७३७३) आणि जळगाव जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन सचिव निलेश पाटिल (मो. ९४२२९७९९८५) यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post