खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - धरणगाव तालुक्यातील नामवंत वैद्यकीय व्यक्तिमत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. नितीन वसंतराव पाटील यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. जीएम फाउंडेशन येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला.
या वेळी धरणगाव तालुक्यातील अनेक मान्यवर आणि पदाधिकारी देखील भाजपात दाखल झाले. यात माजी सरपंच संभाजी उर्फ भैय्या पाटील, बिलखेड्याचे माजी सरपंच बंडूदादा काटे, विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील, उपसरपंच दिलीप भदाणे यांचा समावेश होता.
डॉ. नितीन पाटील हे धरणगाव तालुक्यात केवळ वैद्यकीय क्षेत्रात नव्हे तर सामाजिक कार्यासाठीही ओळखले जातात. रुग्णसेवा आणि समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या प्रवेश सोहळ्याला आमदार राजू मामा भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, पी. सी. पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय महाजन, धरणगाव मंडळाचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, पारधी मंडळाचे तालुकाध्यक्ष किशोर झवर, पंचायत समितीचे माजी सदस्य गजानन सावंत, बाजार समितीचे संचालक ईश्वर चिंधु सावंत, तालुक्याचे माजी सरचिटणीस कन्हैया रायपुरकर, युवा मोर्चाचे चंदन पाटील, विनोद पाटील, दिलीप मराठे, सोनवणे रावसाहेब, श्याम भाऊ पाटील, भगवान गणपत पाटील, राजेंद्र हरी पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यामुळे धरणगाव तालुक्यात भाजपाला नवीन ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Tags
जळगाव