खबर महाराष्ट्र्र न्यूज, पराग काथार - जळगाव जिल्हा पोलीस दलामार्फत स्थानिक गुन्हे शाखेत (स्थागुशा) तब्बल १३ कर्मचाऱ्यांची नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. प्रशासकीय गरज, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने या बदल्या आवश्यक ठरल्या आहेत.
यासंदर्भात संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोस्टे प्रभारी अधिकाऱ्यांना, नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित कार्यमुक्त करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेत झालेल्या बदल्यानंतर अनेक पदे रिक्त होती. यामुळे नवीन नेमणुकीची प्रतीक्षा सुरू होती. अखेर महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर या रिक्त जागा भरून काढण्यात आल्या असून, यात जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
नवीन नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नावे
प्रशांत रमेश परदेशी, उमाकांत पन्नालाल पाटील, राहुल विनायक वानखेडे, मयूर शरद निकम, सचिन रघुनाथ घुगे, प्रेमचंद वसंत सपकाळे, राहुल चंद्रकांत रगडे, विकास मारोती सातदिवे, छगन जनार्दन तायडे, रत्नहरी धोडीराम गिते, सलीम सुभान तडवी, गोपाल उखडू पाटील, रावसाहेब एकनाथ पाटील.
स्थानिक गुन्हे शाखेतील तपास कार्यक्षमता अधिक प्रभावी होण्यासाठी ही नवीन नियुक्ती केली गेली आहे. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक चोख राहील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Tags
जळगाव