"जळगावात हद्दपार आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी केली अटक; लोखंडी चॉपर जप्त"

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I एमआयडीसी पोलिसांनी शहरातून हद्दपार केलेल्या एका आरोपीला बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी सोमवारी (२८ जुलै) अटक केली. पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर (वय २५, रा. तुकारामवाडी, जळगाव) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या ताब्यातून लोखंडी चॉपर जप्त करण्यात आले आहे.

पो.नि. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. योगेश घुगे, पो.उप.नि. चंद्रकांत धनके, पो.हे.कां. गणेश शिरसाळे, संदीप सपकाळे आणि पो.ना. विकास सातदिवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांना सम्राट कॉलनी परिसरात बाविस्कर शस्त्रासह फिरत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली. जोशी टेंट हाऊसजवळ त्याचा शोध लागला. पोलिसांना पाहून तो पळण्याचा प्रयत्न करत असताना दुपारी १.३० वाजता त्याला पकडण्यात आले.

बाविस्करकडे जिल्ह्यात प्रवेशाची कोणतीही परवानगी नसल्याचे तपासात समोर आले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे लोखंडी चॉपर सापडला. पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post