खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | पोलीस दलातील अतुलनीय आणि शौर्यपूर्ण कार्याची दखल घेत वाकडी (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील सुपुत्र श्री. संभाजी नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सीआयडी कल्याण, यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
याआधी त्यांना २०१६ साली मा. राष्ट्रपतींचे पोलीस पदक प्राप्त झाले होते, तर दुसरे राष्ट्रपती पदक २६ जानेवारी २०२३ रोजी जाहीर झाले असून २९ जुलै २०२५ रोजी मुंबई येथील राजभवनात मान्यवरांच्या उपस्थितीत हे पदक देण्यात आले. हा सन्मान मा. राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन, मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम, व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यापूर्वीही त्यांच्या कार्याबद्दल मा. पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह तसेच २८ जुलै २०२५ रोजी मा. डीजी श्रीमती रश्मी शुक्ला यांच्याकडून स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या कुटुंबासह गौरविण्यात आले.
कुटुंबाची सामाजिक बांधिलकीही तितकीच ठळक
श्री. संभाजी देशमुख हे कै. नारायण देशमुख (मा. तेलबिया सेवा संस्था चेअरमन), कै. शिवाजी देशमुख (मा. सरपंच वाकडी), आणि यशस्वी उद्योजक श्री. रमेश देशमुख यांचे बंधू आहेत. गावातील गरिब व गरजूंना मदत, शाळेसाठी आर्थिक सहकार्य, तसेच तरुणांना नोकरीसाठी मार्गदर्शन या कार्यामध्ये देशमुख कुटुंब कायम अग्रेसर राहिले आहे.
त्यांचा मुलगा सध्या अमेरिकेत पीएच.डी. पूर्ण करून उच्च पदावर कार्यरत असून देशमुख कुटुंबाचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे.
गौरवाची परंपरा पुढे चालवणारे अधिकारी
श्री. देशमुख यांनी पोलीस सेवेत श्री. वाय. सी. पवार, श्री. फत्तेसिंह पाटील, श्री. छेरिंग दोरजे, श्री. अनुपकुमार सिंह, श्रीमती अर्चना त्यागी, श्री. आशुतोष डुंबरे, श्री. संदीप जाधव, आणि श्रीमती रश्मी शुक्ला यांसारख्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले आहे. त्यांच्या शिस्तबद्ध आणि कर्तव्यपरायण सेवेमुळे आज ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरत आहेत.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव
या गौरवाबद्दल मा. मंत्री श्री. गिरीश महाजन, व विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी देशमुख कुटुंबाचे अभिनंदन केले आहे. वंजारी समाजासाठी आणि वाकडी गावासाठी हे एक अभिमानास्पद क्षण ठरले आहेत.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------