७००० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, ३३ वा स्तुत्य उपक्रम यशस्वीरीत्या पार

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठानतर्फे गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी आयोजित केला जाणारा शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. यंदाचा हा उपक्रम ३३ व्या वर्षात पदार्पण करत असून, एकूण ७००० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन बाहेती महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला ६ वह्या, २ पेन, २ पेन्सिल, शार्पनर आणि खोडरबर असे साहित्य देण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोलाची भर पडते आहे.

कार्यक्रमास माजी मंत्री सुरेशदादा जैन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, माजी महापौर नितीन लढा व विष्णू भंगाळे, उद्योजक रजनीकांतभाई शाह, भागवतभाऊ भंगाळे, महेंद्रशेठ शाह, योगेश कलंत्री, विनय बाहेती, सुप्रिम इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक सुरेश मंत्री व ज्ञानदेव महाडीक, ॲड. राजेंद्र माहेश्वरी, माजी नगरसेवक विजय आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती माता व ॲड. बबनभाऊ बाहेती यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविक करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शामभाऊ कोगटा यांनी सांगितले की, हा उपक्रम दरवर्षी शहरातील दानशूर व्यक्तींमुळे शक्य होतो. यामध्ये हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाचा भार हलका केला जातो.

कोगटा यांनी आपल्या भाषणात माजी मंत्री सुरेशदादा जैन व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेने आणि सहकार्यामुळेच हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येत असल्याचे सांगितले. गरजू विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या अडचणींवर मात करत हा उपक्रम पुढे नेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास वाणी, क्रीडा रसिक एज्युकेशन सोसायटीचे सचिव अँड. रोहन बाहेती, ईकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. करीम सालार, तसेच समाजसेवक विपुल पारेख यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वागत शाम कोगटा, नगरसेवक मनोज चौधरी, नगरसेवक राजू मोरे, पवन ठाकूर, रमेश माळी, रोहित कोगटा, किरण राजपूत, आनंद महागंडे, विजय पाटील, कैलास चौधरी यांनी केले.सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन मनोज चौधरी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान, क्रीडा रसिक स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय पवन ठाकूर, कैलास ठाकरे, कुणाल बडगुजर, प्रशांत ठाकरे, प्रविण बि-हाडे, मानस तळेले, रमेश माळी, निलेश बारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

शिक्षणासाठी आवश्यक साहित्याच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात दिलासा मिळत असून, समाजातील दानशूर व्यक्ती आणि प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून पुढील पिढी सक्षम होण्यास मदत होत आहे. अशा उपक्रमांचे समाजात मोठे महत्त्व आहे.

Post a Comment

Previous Post Next Post