जळगाव पोलिसांची धडक कारवाई; वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश, ७ गुन्हे उघड

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - शहर पोलिसांनी अट्टल वाहन चोरट्यांना शिताफीने अटक करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. या कारवाईत तब्बल २.३६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शोध पथकाच्या या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

१४ जुलै रोजी गोलाणी मार्केटसमोर मायटी ब्रदर्स दुकानासमोरून फोर्स कंपनीचा टेम्पो (एमएच-१९-०६६६) आणि किर्लोस्कर कंपनीचा ३० किलोवॅटचा जनरेटर चोरीला गेला होता. एकूण ९१,००० रुपयांच्या या चोरीप्रकरणी मिलिंद मुकुंद थत्ते यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावीत आणि निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. गुन्हे शोध पथकाच्या दोन टीम्स तयार करण्यात आल्या. तपासादरम्यान स.फौ. सुनील पाटील, पो.हे.कॉ. उमेश भांडारकर, सतीश पाटील, नंदलाल पाटील, योगेश पाटील, वीरेंद्र शिंदे, भगवान पाटील, अमोल ठाकूर, प्रणय पवार आणि भगवान मोरे यांनी गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शक्कल लढवत तपास केला.

टेम्पोसह आरोपी जामनेर–बोदवड मार्गे मलकापूर–नांदुरेकडे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग सुरू केला. वडनेर भोईजी गावाजवळ टेम्पो अपघातग्रस्त अवस्थेत आढळला. काही अंतरावरच एका ढाब्यावर आरोपी जखमी अवस्थेत बसलेले दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक आरोपींची नावे

मंगेश सुनील मिस्तरी (वय २०, रा. कांचन नगर, जळगाव – सध्या रा. शिरसोली)

यश अनिल सोनार (वय २०, रा. समता नगर, जळगाव – सध्या रा. शिरसोली)

दोघांनी जळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून जनरेटर व्हॅन, टाटा एस छोटा हत्ती मालवाहतूक वाहन आणि ५ मोटारसायकली असा एकूण २,३६,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे खालील पोलीस ठाण्यांतील गुन्हे उघडकीस आले:

शहर पोलीस ठाणे – १ गुन्हा

जिल्हापेठ पोलीस ठाणे – ३ गुन्हे

एमआयडीसी पोलीस ठाणे – २ गुन्हे

रामानंद नगर पोलीस ठाणे – १ गुन्हा

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
स.फौ. सुनील पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, सतीश पाटील, नंदलाल पाटील, योगेश पाटील, वीरेंद्र शिंदे, दीपक शिरसाठ, पो.ना. भगवान पाटील, पो.कॉ. अमोल ठाकूर, भगवान मोरे, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार तसेच नेत्रम येथील पो.कॉ. पंकज खडसे आणि मुबारक देशमुख यांचा मोलाचा सहभाग होता.

Post a Comment

Previous Post Next Post